*🇮🇳 अशी होते तिरंगी झेंड्याची निर्मिती !*
*सौजन्य : सकाळ*
*दि. ९ ऑगस्ट २०२२*
तिरंगी ध्वज बनतात मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड विभागात, देशभरात अभिमानाने फडकतो तिरंगी झेंडा.
नांदेड : केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला तीन रंगांचा मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज हा भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. पण या तिरंगी ध्वजातील तिन रंग कसे आणि कुठुन एकत्र येतात. त्याचे प्रमाणिकरण कसे केले जाते. कपड्याच्या साईजनुसार कोणती दोरी वापरली जाते, नेफा पट्टी कोणत्या कापडापासून तयार केली जाते. या सारख्या अतिशय दुर्मिळ माहितीचा खजाना ‘सकाळ’ने या लेखात आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
*अशी झाली मराठवाडा खादी समितीची स्थापना*
आजच्या ६५ वर्षापूर्वी हैदराबाद येथे खादी समितीचे मुख्य तर लातूर जिल्ह्यातील ‘औसा’ येथे उपकेंद्र होते. ही संस्था महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा आंध्रप्रदेश पर्यंत विखुरली होती. कालांतराने मराठी भाषावाद निर्माण झाला आणि १ मे १९६० ला स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर मराठी माणसाच्या मनात मराठवाडा खादी समिती वेगळी व्हावी, असा विचार रूजत गेला आणि १९६७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ व स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुढाकारातुन मराठवाडा खादी समितीची स्थापना आली. शरद पवार यांच्यामुळे खादीला ‘अच्छे दिन’ मराठवाडा खादी समितीच्या स्थापनेनंतर सुरवातीस मराठवाड्यात खादीची १५ केंद्र होती. यात खादी कपड्यांची निर्मिती होत असे. अंबेजोगाई, बीड, औसा, उदगीर ही खादी उत्पादनाची मुख्य केंद्र म्हणून ओळखली जात. यात ‘दोसुती’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जाड्या भरड्या कापडाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात होती. १९७८ मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दल’ (पुलोद) सरकार सत्तेवर आले आणि शरद पवार पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुलोद सरकार सत्तेवर येताच शरद पवार यांनी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना खादीचे ‘दोसुती’ कापड वापरणे बंधनकारक केले. यासाठी शासनाकडून दरवर्षी खादीला एक कोटी रुपयांची कपड्यांची मागणी असायची. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने खादीला ‘अच्छे दिन’ आले.
आणि पुन्हा खादीला उतरती कळा लागली तीन वर्षानंतर, अचानक ‘पुलोद’ सरकार कोसळले त्यामुळे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मंत्रालय भारत सरकारकडून मिळणाऱ्या खादी कपड्यांची मागणी बंद झाली आणि खादीला पुन्हा उतरती कळा लागली. दरम्यान, कर्नाटक व इतर एका ठिकाणाहून तिरंगी ध्वज तयार करुन ते देशात पाठवले जात होते. परंतु, देशातील एकंदरित तिरंगी झेड्यांची मागणी लक्ष घेता या केंद्राकडून तिरंगी झेंड्याची मागणी पूर्ण होत नव्हती; म्हणून मराठवाडा खादी समितीकडे असलेल्या खादी कपड्यापासून तिरंगी झेंडा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कपड्याचे उत्पन्न करण्याची मागणी मिळाली. तिरंगी ध्वजाची १९८२ सालापासून मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड विभागातील उदगीर केंद्रात कपड्याची निर्मिती सुरू झाली. उत्पादित केलेले हे कापड मुंबई येथील खादी ग्रामोद्योग संघाच्या डॉकीयॉर्ड येथे पुरविले जात. खादीचे कापड योग्य की अयोग्य यासाठी मुंबईहून सुरेश जोशी आणि श्री.पटेल ही दोन व्यक्ती कापडाची गुणवत्ता तपासून तिरंगी झेंड्यासाठी लागणारे खादीचे कापड घेऊन जात. दहा वर्षापर्यंत हा उपक्रम सुरू होता.
*मराठवाडा खादी ग्रामोद्योगची कोटीची उड्डाणे*
मराठवाडा खादी समितीच्या नांदेड मध्ये तिरंगी झेंडा का? तयार करू नये असे वाटले. आणि प्रत्यक्ष विचार कृतीत उतरला आणि चक्क सुरेश जोशी नावाच्या गृहस्थाला नांदेडला बोलावून तिरंगी झेंड्याची निर्मिती सुरू झाली. आज मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड विभागात तयार झालेला तिरंगी ध्वज देशभरात अभिमानाने फडकतो. वर्षाला विविध आकारामध्ये १५ ते २० हजार तिरंगी ध्वज तयार केले जातात. यातुन मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस वर्षाला एक कोटी रूपयांचे उत्पन्न एकट्या तिरंगी झेंड्यातुन मिळते. बीआयएस अंतर्गत तपासणी ब्युरो ऑफ इंडीयन स्टॅडर्ड (बीआयएस) ही एक शासकीय नामांकन पद्धत आहे. याद्वारे कपड्याची क्वॉलिटी तपासली जाते. त्यानंतर तिरंगी झेंड्यासाठी कापडाची निवड केली जाते. प्रक्रियेसाठी एक महिण्याचा अवधी. उदगीर येथे तयार झालेली ‘बटींग’ खादीचे तीन प्रकार असतात. हिरवा, केशरी ही दोन रंगाची कापड ब्लिचिंगसाठी अहमदाबाद येथे पाठविली जातात. यासाठी कपडा पाठवण्यासाठी व पुन्हा कपडा परत येण्यासाठी किमान १६ दिवस जातात. तर कपड्याला ब्लिच करण्यासाठी १५ दिवस लागतात. त्यामुळे तिरंगी झेंड्याच्या कापडावर प्रक्रिया करण्यासाठी एक महिण्याचा अवधी लागतो. ब्लिचिंग नंतर कपड्याची केली जाते कटींग -१४ बाय २१ फुट, ८ बाय २१ फुट, ६ बाय ९ फुट, ४ बाय ९ फुट, ३ बाय साडेचार फुट, २ बाय ३ फुट या शिवाय कार फ्लग हे साडेसाह इंच बाय नऊ इंच, अशा विविध आकारामध्ये तिरंगी ध्वज तयार केले जातात.
तिरंगी ध्वजाच्या दोन्ही आकारावर अशोकचक्र छापले जाते. त्यानंतर केशरी, पांढरा आणि हिरवा रंग एकत्रित करुन ध्वज शिलाई केली जाते. त्यानंतर ध्वज फडकताना फाटु नये म्हणून ध्वजाच्या चारी बाजुने ॲंगल लावला जातो. आणि सर्वात शेवटी डक खादी कपड्याची नेफा पट्टी लावली जाते. या साईजच्या फ्लॅगसाठी दोरीचे मापदंड विविध प्रकारच्या आकारामध्ये तयार करण्यात आलेल्या ध्वजासाठी विविध साईज मध्ये ‘दोरी’ आणि ‘गरेडी’ वापरावी लागते. यासाठी १४ बाय २१ फुटाच्या ध्वजासाठी ३८ एमएम, ८ बाय १२ फुटा साठी ३२ एमएम, ६ बाय ९ साठी २५ एमएम, २ बाय ३ साठी १९ एमएम दोरीचा वापर केला जातो तर कार फ्लॅगसाठी ‘ब्रास’ नावाचा वायर पापरला जातो.
वर्षाला १५ ते २० हजार ध्वज निर्मिती पंचवीस वर्षापूर्वी मी नांदेडच्या खादी भांडारात येऊन तिरंगी झेंड्यासाठी लागणाऱ्या कापडाचे प्रामाणिकिकरण करुन योग्य कापडाची निवड करत होतो. त्यानंतर मला मराठवाडा खादी समितीने नांदेडला बोलावले आणि तिरंगी ध्वज निर्मितीचे नगावर काम दिले. तेव्हा पासून मी केवळ तिरंगी ध्वजाच्या प्रेमापोटी परिवार सोडून नांदेडात आलो. सुरुवातीस वर्षाला एक हजार पर्यंत तिरंगी ध्वज निर्मिती केली जात होती. आज वर्षाला १५ ते २० हजार ध्वज निर्मिती केली जाते.
*सुरेश जोशी, राष्ट्रध्वज उत्पादक प्रमुख*
No comments:
Post a Comment