, म्हणजे मुंबईतल्या शंभर-दीडशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघणार, असा अंदाज होता.
पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून उत्तुंग घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा होऊ लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा निरोप होता. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात येऊ लागला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील १०७ हुतात्मे
१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी. शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के. जे. झेवियर
१०) पी. एस. जॉन
११) शरद जी. वाणी
१२) वेदीसिंग
१३) रामचंद्र भाटीया
१४) गंगाराम गुणाजी
१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६) निवृत्ती विठोबा मोरे
१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८) बालप्पा मुतण्णा कामाठी
१९) धोंडू लक्ष्मण पारडूले
२०) भाऊ सखाराम कदम
२१) यशवंत बाबाजी भगत
२२) गोविंद बाबूराव जोगल
२३) पांडूरंग धोंडू धाडवे
२४) गोपाळ चिमाजी कोरडे
२५) पांडूरंग बाबाजी जाधव
२६) बाबू हरी दाते
२७) अनुप माहावीर
२८) विनायक पांचाळ
२९) सिताराम गणपत म्हादे
३०) सुभाष भिवा बोरकर
३१) गणपत रामा तानकर
३२) सिताराम गयादीन
३३) गोरखनाथ रावजी जगताप
३४) महमद अली
३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६) देवाजी सखाराम पाटील
३७) शामलाल जेठानंद
३८) सदाशिव महादेव भोसले
३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१) भिकाजी बाबू बांबरकर
४२) सखाराम श्रीपत ढमाले
४३) नरेंद्र नारायण प्रधान
४४) शंकर गोपाल कुष्टे
४५) दत्ताराम कृष्णा सावंत
४६) बबन बापू भरगुडे
४७) विष्णू सखाराम बने
४८) सिताराम धोंडू राडये
४९) तुकाराम धोंडू शिंदे
५०) विठ्ठल गंगाराम मोरे
५१) रामा लखन विंदा
५२) एडवीन आमब्रोझ साळवी
५३) बाबा महादू सावंत
५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५) विठ्ठल दौलत साळुंखे
५६) रामनाथ पांडूरंग अमृते
५७) परशुराम अंबाजी देसाई
५८) घनश्याम बाबू कोलार
५९) धोंडू रामकृष्ण सुतार
६०) मुनीमजी बलदेव पांडे
६१) मारुती विठोबा म्हस्के
६२) भाऊ कोंडीबा भास्कर
६३) धोंडो राघो पुजारी
६४) हृदयसिंग दारजेसिंग
६५) पांडू माहादू अवरीरकर
६६) शंकर विठोबा राणे
६७) विजयकुमार सदाशिव भडेकर
६८) कृष्णाजी गणू शिंदे
६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०) धोंडू भागू जाधव
७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३) करपैया किरमल देवेंद्र
७४) चुलाराम मुंबराज
७५) बालमोहन
७६) अनंता
७७) गंगाराम विष्णू गुरव
७८) रत्नु गोंदिवरे
७९) सय्यद कासम
८०) भिकाजी दाजी
८१) अनंत गोलतकर
८२) किसन वीरकर
८३) सुखलाल रामलाल बंसकर
८४) पांडूरंग विष्णू वाळके
८५) फुलवरी मगरु
८६) गुलाब कृष्णा खवळे
८७) बाबूराव देवदास पाटील
८८) लक्ष्मण नरहरी थोरात
८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०) गणपत रामा भुते
९१) मुनशी वझीरअली
९२) दौलतराम मथुरादास
९३) विठ्ठल नारायण चव्हाण
९४) देवजी शिवन राठोड
९५) रावजीभाई डोसाभाई पटेल
९६) होरमसजी करसेटजी
९७) गिरधर हेमचंद लोहार
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) गणपत श्रीधर जोशी
१००) माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०१) मारुती बेन्नाळकर
१०२) मधूकर बापू बांदेकर
१०३) लक्ष्मण गोविंद गावडे
१०४) महादेव बारीगडी
१०५) कमलाबाई मोहिते
१०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर
१०७) शंकरराव तोरस्कर

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला सुरुवात होऊन १ मे, इ.स. १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.
अखंड महाराष्ट्राचे स्वप्न या हुतात्म्यांनी साकारले…
No comments:
Post a Comment