Sunday, 11 December 2022

आम्ही आहोत खान्देशी

🚩🚩 *आम्ही आहोत खान्देशी...* 🚩🚩

जिथे जन्मली *"झाशीची राणी"*
ती आहे *"पारोळा नगरी"*
असे हे पारोळा आहे खान्देश प्रांता मधील.

🙏🏾आम्ही आहोत खान्देशी🙏🏾

जिथे जन्मल्या *"बहिणाबाई"*
ते आहे खान्देश प्रांति ,
आम्ही म्हणतो त्याला *"जळगाव नगरी"*

🙏🏾आम्ही आहोत खान्देशी🙏🏾

जिथे जन्माला आली भारताची 
कोकीळा- *"लता ताई मंगेशकर"*
आम्ही म्हणतो त्या नगरीला *"शिरपूर नगरी"*

🙏🏾आम्ही आहोत खान्देशी 🙏🏾

जिथे जन्माला आल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती *"प्रतिभा ताई पाटील"*
त्या नगरीला आम्ही म्हणतो *"बोदवड जळगांव"*
जे आहे खान्देश प्रांति.

🙏🏾 आम्ही आहोत खान्देशी 🙏🏾

जिथे जन्माला आले, भारताचे सर्वात "हुशार ,
आणि कायद्याचे तज्ञ"
ज्यांनी कसाब - अफजल गुरु यांना फासावर लटकवले -
आम्ही त्यांना म्हणतो *"उज्वल भाऊ निकम"*
जन्मास आले ते ह्या नगरी ,
ज्या नगरीला आम्ही म्हणतो  *"चोपड़ा"* जळगाव नगरी.

जिथे सतीच सट घडले ,
"जिथे भक्तांची ईच्छा पूर्ण होते"
*संपूर्ण खान्देशात गजबजणारी "सती माय"*
ची यात्रा जिची महाराष्ट्रात दुर दुर पर्यंत ख्याती.
देवी वसली बाेरीस गावी...*धुळे नगरी*

पहिले बाल हुतात्मे *शिरीष कुमार*
ज्या नगरीत जन्मास आले त्या नगरीस आम्ही म्हणतो नंदनगरी *"नंदुरबार".*

महाराष्ट्रातील एकमेव एक मुखी *दत्तात्रेय महाराज* ज्या नगरीस जन्मले ,
ती आहे *"साऱंगखेडा"* नगरी

भारतातील सगळ्यात मोठा *घोडे बाजार* भरतो
ती आहे *"सारंगखेडा नगरी"*

Bollywood मध्ये सगळ्यात पहिले महाराष्ट्राचे नाव कोरणारी अभिनेत्री *"स्मिता पाटील"*
ज्या नगरीत जन्मास आले ,
ती आहे *"शिरपूर नगरी"*

*"पश्चिम काशी"* म्हणुन ओळख असणारे *"प्रकाशा"* हे ज्या नगरीत आहे ,
त्यास आम्ही म्हणतो नंदनगरी *"नंदुरबार"*

*"आधार कार्ड"* ची सुरुवात ज्या जागेवरून झाली ते गाव *"कोटली"*
ज्या नगरीत आहे त्यास आम्ही म्हणतो नंदनगरी *"नंदुरबार"*

आणि सगळ्यात महत्वाचे जसे भारताचे *मुकुट* म्हणुन *काश्मीर* चे नाव ,
तसे महाराष्ट्राचे *मुकुट* म्हणून *"खान्देश "* चे नाव घेतले जाते.

आशिया खंडातील पहिला
*"सोने शुद्धीकरण कारखाना"* आहे ,
ती नंदनगरी *"शिरपूर"*

हिन्दुस्थानातील पहिला *"सौरउर्जा"* प्रकल्प आहे ती नंदनगरी *"साक्री"*

हिन्दुस्थानातील पहिले *"पाणलोट क्षेञ"* राबविणारी आहे ती नंदनगरी *"शिरपूर"*

भारतातील गौराभिमुख स्वयंभु *"मंगळग्रह मंदिर"*
ज्या बोरी नदी काठी वसे ते आहे
सखाराम महाराजांचा *"अमळनेर"* नगरी.

*"सानेगुरुजींची"* कर्मभूमी ,
व सर्वात मोठे तत्वद्यान केंद्र ज्या नगरीत
ते *"अमळनेर"* आहे जळगांव जिल्हयात.                 

*"प्रति तिरूपती"* म्हणून ज्याला संबोधले जाते
हुबेहुब तिरुपती बालाजी मंदिर जिथे आहे ,
ते *"पारोळा"* आहे जळगांव जिल्हयात.             

🙏🏾आम्ही आहोत खान्देशी🙏🏾

अशी ही आमची खान्देश नगरी,
*स्वतःला लाज नको वाटू देऊ तू खान्देशी असल्याची.*
बोला गर्वाने मी आहे खान्देशी,
राहतो मी खान्देश _*जळगाव*_ह्या नगरी


*🚩"जय हिन्द जय खान्देश"... 🚩*

🙏सुप्रभात🙏

Sunday, 6 November 2022

भारतात 8 रंगांच्या नंबरप्लेट

भारतात 8 रंगांच्या नंबरप्लेट
आपण दररोज प्रवास करतो, कधी स्वत: वाहन चालवतो किंवा कधी सहप्रवासी असतो. यावेळी आपल्या आजुबाजुला अनेक प्रकारची वाहने ये-जा करत असतात. त्यावर वेगवेगळ्या नंबरप्लेटही लावलेल्या असतात. आता केवळ सरकारी अधिकारी, पोलीस आणि काही मोजक्याच लोकांना लाल दिवा लावण्याची परवानगी आहे.
मग अशावेळी आपल्या आजुबाजुने जाणाऱ्या गाड्यांच्या नंबरप्लेटवरून गाडी कोणाची आहे ते ओळखता यायला हवे. काही रंगाच्या नंबरप्लेट या अत्यंत महनीय व्यक्तींच्या असतात. त्यांना वाट न दिल्यास कारवाईही होऊ शकते.
देशात वेगवेगळ्या अशा 8 प्रकारच्या रंगांच्या नंबरप्लेट आहेत. प्रत्येक रंगाच्या वाहनाचा वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला .जातो. आज आपण या प्रत्येक रंगाची माहिती घेऊ.
देशभरात तुम्हाला सर्वत्र पांढरी आणि पिवळी असे दोन रंगातील नंरप्लेट सर्वाधिक दिसतात.

 पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट ही खासगी, सामान्य वापरासाठी असते. या नंबप्लेटच्या वाहनाचा व्यवसायासाठी वापर करत येत नाही. यामुळे अनेकांना ही खासगी वापराची गाडी असल्याचे समजते.

दुसरा रंग पिवळा. पिवळ्या रंगाची नंबरप्लेट पाहून देखील आपल्याला समजते की ती व्यवसायासाठी वापरली जाणारी गाडी आहे. ट्रक, टॅक्सी, अॅम्बुलन्स, बस आदीसाठी ही पिवळी नंबरप्लेट वापरतात. दोन्ही नंबरप्लेटमधील नंबर हे काळ्या रंगात असतात.

निळी नंबरप्लेट
निळ्या रंगाची नंबरप्लेट अशा वाहनांना मिळते ज्यातून परदेशांचे प्रतिनिधी प्रवास करतात. या रंगाच्या नंबरप्लेटच्या गाड्या या दिल्लीमध्ये सर्वाधिक आणि मुंबईमध्ये फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. या गाड्या परदेशांच्या दुतावासातील प्रतिनिधी वापरतात. यावर पांढऱ्य़ा रंगात नंबर असतात.

काळ्या रंगातील नंबरप्लेटच्या गाड्या या व्यवसायासाठी वापरल्या जातात. परंतू त्या गाड्या खास व्यक्तींसाठी असतात. जसे की झूम कार वगैरे. या गाड्यांच्या नंबरप्लेट या काळ्या रंगात असतात. तर नंबर पिवळ्या रंगात.काळी नंबरप्लेट

लाल नंबरप्लेट
आता हा रंग खूप महत्वाचा आहे. या रंगातील नंबरप्लेटच्या गाड्या राष्ट्रपती, राज्यपाल किंवा लष्करातील मोठे अधिकारी वापरतात. या गाड्यांच्या नंबरप्लेटवरील रंग हा सोनेरी रंगात असतो. तसेच नंबरप्लेटवर अशोकचक्रही असते. या गाड्या दिसताच रस्त्यावरून पुढे जाण्यासाठी वाट करून द्यावी लागते.

बाण असलेली नंबरप्लेट
लष्करी वाहनांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेट असतात. त्यांचा उद्देशही वेगवेगळा असतो. ही वाहने संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असतात. अशा गाड्यांच्या नंबरप्लेटवरील पहिल्या किंवा तिसऱ्या अंकाच्याजागी वरच्य दिशेने दाखविलेला बाण असतो.
लष्कराच्या या वाहनांचा नंबर 11 आकडी असतो. बाणानंतर लगेचच दोन अंक असतात. ते हे वाहन कोणत्या वर्षी खरेदी केले आहे, ते दर्शविते. या वाहनांनाही खूप महत्व असते. या वाहनांतून लष्करप्रमुख, ब्रिगेडिअर यांसह ट्रकसारखी वाहने असतील तर त्यातून लष्करी सामग्री किंवा जवानांची नेआण केली जाते.

हिरवा
हिरव्या रंगाची नंबरप्लेट ही आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरली जाते.

Monday, 22 August 2022

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1

💁‍♀️दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1 

1.     Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?
2.     Welcome. स्वागत ! सुस्वागतम !
3.     Get ready. तयार हो.
4.     Sit here. इथे बस.  इथे बसा.
5.     Who? कोण?
6.     Well done! शाब्बास ! चांगले केले.
7.     He fell.तो पडला.
8.     Hold this. हे धर. हे धरा.
9.     Leave it.  ते सोड.
10.  Run! पळ.
11.  Sit down! खाली बस ! खाली बसा.
12.  Wait here. इथे थांब. इथे थांबा.
13.  Go inside. आत जा.
14.  We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.
15.  I won . मी जिंकलो.
16.  Who am I ? मी कोण आहे ?
17.  Wow ! वाह !
18.  What's up ? काय चाललंय ?
19.  Stand up !  ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.
20.  We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.
21.  They won. ते जिंकले.
22.  We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.
23.  We talked. आम्ही बोललो.
24.  Who is it ? कोण आहे ?
25.  Use this.  हे वापर. हे वापरा.
26.  No way ! शक्यच नाही !
27.  Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?
28.  Get up ! ऊठ !
29.  Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.
30.  I know. मला माहीत आहे.
31.  Who is he ? तो कोण आहे ?
32.  I want it. मला ते हवं आहे.
33.  I'm OK. मी ठीक आहे.
34.  Listen. ऐक.
35.  Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.
36.  We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.
37.  Really ? खरंच का ?
38.  Try it on. घालून बघ. घालून बघा.
39.  Thanks. धन्यवाद.
40.  Why me ? मीच का ?
41.  I lost. मी हरलो.
42.  I saw you. मी तुला बघितलं.
43.  They lied. ते खोटं बोलले.
44.  That's it. बरोबर.
45.  Ask him त्याला विचार.त्याला विचारा.
46.  Take mine. माझे घे. माझा घे.
47.  It's new.  ते नवीन आहे.
48.  Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.
49.  What for ? कशासाठी ?
50.  I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.
51.  Don't cry. रडू नकोस. रडू नका.
52.  They left. ते निघाले.
53.  Who came ? कोण आलं ?
54.  Take care ! काळजी घे. काळजी घ्या.
55.  Dogs bark. कुत्रे भुंकतात.
56.  They lost. ते हरले.
57.  Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?
58.  He knits. तो विणतो.
59.  Thank you. धन्यवाद.
60.  Call me. मला फोन करा. मला बोलवा.
61.  Forget me. मला विसरून जा.
62.  He came. तो आला.
63.  Sign here. इथे सही करा.इथे सही कर.
64.  Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.
65.  Come on ! चल ! चला !
66.  Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.
67.  He knows. त्याला माहीत आहे.
68.  Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.
69.  Come in. आत ये.
70.  Forget it. विसरून जा.
71.  Take this. हे घे. हे घ्या.
72.  Fold it. घडी घाल.
73.  He left.  तो निघाला.
74.  Stay back. मागे राहा.
75.  She walks. ती चालते.
76.  I'm right. मी बरोबर आहे.
77.  Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.
78.  I'm young. मी तरूण आहे.
79.  Call Dipak.दिपकला बोलव.
80.  Get down. खाली हो.
81.  Go home. घरी जा.
82.  Have fun. मजा कर.
83.  I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.
84.  Sit there. तिथे बस.तिथे बसा.
85.  He runs. तो पळतो.
86.  He spoke. तो बोलला.
87.  Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.
88.  I'm ill. मी आजारी आहे.
89.  It's here. इथे आहे.
90.  Stay away. दूर रहा.
91.  It's me ! मी आहे !
92.  Let me go. मला जाऊ द्या.
93.  Let's ask. विचारू या.
94.  I’m Santosh.मी संतोष आहे.
95.  Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !
96.  She cried. ती रडली.
97.  It's OK. ठीक आहे.
98.  She tried. तिने प्रयत्न केला.
99.  Me, too. मी पण. मला पण.
100.        See below. खाली पाहा.

Saturday, 20 August 2022

रंगाची संपूर्ण माहिती Colour information in Marathi

रंगाची संपूर्ण माहिती Colour information in Marathi

Colour information in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण रंग बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण आपले रंगीबेरंगी जग जेवढे सुंदर आहे, तेवढेच आश्चर्यकारक आहे या रंगांचे जग. बालपणात, आपल्याला फक्त त्या सात रंगांची नावे शिकवली जातात जी आपण इंद्रधनुष्यात पाहू शकतो.

परंतु, सत्य हे आहे की आपण काही संख्या किंवा गणनामध्ये रंग मोजण्यात मर्यादित आहोत. करू शकत नाही. रंग मोजले जात नाहीत कारण या जगात अनेक रंग आहेत. याचे कारण असे की, कोणतेही दोन रंग मिसळून आपण तिसरा रंग बनवू शकतो आणि त्या दोन रंगांचे प्रमाण बदलून आपल्याला अनेक रंग मिळू शकतात. अशाप्रकारे आपण वेगवेगळ्या जोड्यांमधून असंख्य रंग बनवू शकतो.

Colour information in Marathiरंगाची संपूर्ण माहिती Colour information in Marathi

अनुक्रमणिका

1 रंगाची संपूर्ण माहिती Colour information in Marathi2 रंगाचा इतिहास (History of color)3 रंगाचा शोध कसा लागला? (How did color come about?)4 रंगाबद्दल माहिती (Information about color)4.1 प्राथमिक रंग:-4.2 दुय्यम रंग:-4.3 तृतीयक रंग:-

 

रंगाचा इतिहास (History of color)

रंग आपल्या आयुष्यात हजारो वर्षांपासून आहेत. इथे आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात सुरू आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननात सापडलेल्या गोष्टींमध्ये अशी भांडी आणि मूर्ती होत्या, ज्या रंगवल्या होत्या. त्यांच्यामध्ये लाल रंगाच्या कापडाचा तुकडाही सापडला.

तज्ञांच्या मते, मजीथ किंवा मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग त्यावर लावला गेला. हजारो वर्षांपासून, मडजीथचे मूळ आणि बक्कम झाडाची साल लाल रंगाचे मुख्य स्त्रोत होते. पीपल, गुलार आणि पाकड सारख्या झाडांवर लाख वर्म्सच्या लाह्यापासून महौर रंग तयार केला गेला. हळदीपासून पिवळा रंग आणि सिंदूर मिळाला.

रंगाचा शोध कसा लागला? (How did color come about?)

सुमारे शंभर वर्षांपूर्वी पश्चिमेकडील औद्योगिक क्रांतीमुळे वस्त्रोद्योग वेगाने वाढला. रंगांचा वापर वाढला. नैसर्गिक रंग मर्यादित प्रमाणात उपलब्ध होते, त्यामुळे वाढीव मागणी नैसर्गिक रंगांमुळे शक्य नव्हती. अशा परिस्थितीत कृत्रिम रंगांचा शोध सुरू झाला. त्याच वेळी, लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्रीमधील विल्यम पार्किन्सन अॅनिलिनपासून मलेरियाचे औषध क्विनिन बनवण्यात गुंतले होते.

सर्व प्रयोगानंतरही क्विनीन बनवता आले नाही, पण जांभळा रंग नक्कीच तयार झाला. केवळ योगायोगाने, 1856 मध्ये तयार केलेल्या या कृत्रिम रंगाला मौवे म्हटले गेले. नंतर, 1860 मध्ये राणी रंग, 1862 मध्ये एनलॉन ब्लू आणि एनलॉन ब्लॅक, 1865 मध्ये बिस्माई ब्राउन, 1880 मध्ये कॉटन ब्लॅकसारखे रासायनिक रंग अस्तित्वात आले.

सुरुवातीला हे रंग कोळशाच्या डांबरातून तयार केले जात. नंतर, ते इतर अनेक रासायनिक पदार्थांच्या मदतीने बनवले जाऊ लागले. जर्मन रसायनशास्त्रज्ञ Adडॉल्फ फोनेन यांनी 1865 मध्ये कृत्रिम नील विकसित करण्याचे काम हाती घेतले. अनेक अपयश आणि प्रदीर्घ परिश्रमानंतर 1882 मध्ये ते नाईलची रचना निश्चित करण्यात यशस्वी झाले. पुढील वर्षी रासायनिक नील देखील तयार होऊ लागले. या महत्त्वाच्या कार्यासाठी बेयर यांना 1905 मध्ये नोबेल पारितोषिकही मिळाले होते.

राणी रंग (किरमिजी) प्रथम 1867 मध्ये कामराजजी नावाच्या मुंबई पेंट फर्मने आयात केली होती. 1872 मध्ये, जर्मन पेंट विक्रेत्यांचा एक गट अलीझारिन नावाचा रंग घेऊन येथे आला. या लोकांनी भारतीय रेंजर्समध्ये आपला रंग चालवण्यासाठी सर्व युक्त्या स्वीकारल्या. सुरुवातीला त्याने त्याचे रंग नमुने म्हणून मोफत वाटले. नंतर चांगले व्याज आकारले गेले. रासायनिक रंग भाज्यांच्या रंगांपेक्षा खूपच स्वस्त होते. त्यांच्यात झटपट चमकही होती. तेही सहज उपलब्ध होते. म्हणून, आपल्या नैसर्गिक रंगांच्या परंपरेत हे रंग सहज पकडले गेले.

रंगाबद्दल माहिती (Information about color)प्राथमिक रंग:-

प्राथमिक रंग म्हणजे ते रंग जे आपण इतर रंगांच्या मदतीने बनवू शकत नाही. हे रंग आहेत – लाल, पिवळा आणि निळा. हे तीन रंग आधार किंवा पाया रंग आहेत जे कोणत्याही रंगाचे मिश्रण करून बनवता येत नाहीत. परंतु, या तीन रंगांद्वारे आपण विविध प्रकारचे रंग बनवू शकतो.

हे प्राथमिक रंग म्हणजे लाल, पिवळा आणि निळा एकत्र वापरताना विविध आणि आकर्षक दिसतात. हे रंग तीव्रता, वेग आणि आणीबाणी दर्शवतात.

दुय्यम रंग:-

कोणत्याही दोन प्राथमिक रंगांचे समान प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा नवीन तिसरा रंग दुय्यम रंग असे म्हणतात. तीन प्राथमिक रंग समान प्रमाणात मिसळल्याने तीन संयोजना होतात ज्यामधून तीन नवीन दुय्यम रंग तयार होतात. :-

लाल + पिवळा = केशरी.

पिवळा + निळा = हिरवा

लाल + निळा = व्हायलेट.

कलर व्हीलमधील दुय्यम रंग दोन प्राथमिक रंगांच्या दरम्यान आहेत जे एकत्रित होऊन दुय्यम रंग तयार करतात.

तृतीयक रंग:-

तृतीयक रंग “मधले” रंग आहेत. हे रंग प्राथमिक रंग आणि त्याच्या शेजारी दुय्यम रंगाच्या संयोगाने तयार होतात. प्राथमिक किंवा दुय्यम रंगाचे प्रमाण किंवा प्रमाण बदलून. आपण अनेक तृतीयक रंग बनवू शकतो. लालसर-नारिंगी, पिवळसर-नारिंगी, पिवळसर-हिरवा, निळसर-हिरवा, लालसर-व्हायलेट, निळसर-व्हायलेट-मूलभूत तृतीयक रंग आहेत.

हे रंग तुमच्या आयुष्यात आपली सावली पसरवतात आणि सुंदर बनवतातच, पण हे रंग तुमच्या मनावर, मनावर, भावनांवर आणि स्वभावावरही त्यांचा प्रभाव दाखवतात. तुमचे आवडते रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वालाही प्रतिबिंबित करतात. म्हणूनच मानसशास्त्रात रंगांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. मानवी भावनांवर रंगांच्या परिणामांनुसार रंगांचे दोन भाग केले जाऊ शकतात:-

(1) उबदार रंग:- हे रंग उबदारपणा आणि उबदारपणाची छाप देतात. आपण रंग म्हणू शकतो. आपण अशा रंगांना सूर्य, प्रकाश दुपार आणि संध्याकाळशी जोडू शकतो. उबदार रंग हे आपले लक्ष वेधून घेणारे पहिले आहेत.

(२) छान रंग:- हे रंग शांत, निरोगी, शांत, स्थिर, आरामदायक आणि थंडपणा प्रदान करणारे आहेत. आपण हे रंग पाणी, हवा, निसर्ग आणि वनस्पतींच्या संदर्भात पाहू शकतो. तर निळा, हिरवा आणि जांभळा रंग या वर्गात येतात. काही लोक या श्रेणीमध्ये राखाडी किंवा राखाडी रंग देखील ठेवतात.

आम्ही प्रत्येक वर्गाच्या संदर्भात हे वर्गीकरण तपशीलवार पाहतो. प्रत्येक रंग स्वतःमध्ये काही वैशिष्ट्ये टिकवून ठेवतो, ज्याचा थेट परिणाम मानवांवर होतो. हा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतो. म्हणूनच उत्पादन पॅकेजिंग, लोगो डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रंगांवर परिणाम होतो. विशेष लक्ष दिले जाते.

(1) लाल रंग: – लाल रंग शारीरिक प्रतिक्रियांशी संबंधित आहे. हा रंग धोक्याचा, तीव्रतेचा आणि उत्साहाचा सूचक आहे. जिथे एकीकडे हा रंग धैर्य, सामर्थ्य आणि उत्साह वाढवतो, दुसरीकडे तो अवज्ञा आणि बंडखोरी आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती वाढते. इतर रंगांच्या तुलनेत, हा रंग स्वतःवर लक्ष केंद्रित करणारा पहिला आहे. या कारणास्तव लाल रंगाचा वापर जागतिक स्तरावर ट्रॅफिक लाइटमध्ये केला जातो.

(२) निळा रंग:- निळ्या रंगाचा मेंदूवर परिणाम होतो. हा रंग आरामदायक, आरामदायक आणि आरामदायक आहे. हा रंग वाईट स्वप्ने आणि विचार काढून टाकतो आणि परस्पर विश्वास, त्याग आणि शरणागतीची भावना वाढवतो. यासह, हा रंग बौद्धिक क्षमता आणि एकाग्र करण्याची क्षमता देखील वाढवतो.

(३) पिवळा रंग:- हा रंग थेट आपल्या भावनांशी संबंधित असतो. मानसशास्त्रात हा सर्वात शक्तिशाली आणि अवघड रंग मानला जातो. जिथे पिवळ्या रंगाची योग्य सावली सकारात्मकता, सर्जनशीलता, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि मैत्रीची भावना वाढवते. त्याच रंगाची चुकीची सावली ही भीती, नैराश्य आणि रोगाचे लक्षण आहे.

(4) हिरवा रंग:- हा रंग शारीरिक संतुलन आणि सुसंवाद यांचे प्रतीक आहे. हा रंग शांती, प्रेम, ऐक्य वाढवतो. आहे.

(5) व्हायलेट रंग:- या रंगाच्या मतामध्ये एक आश्चर्यकारक कॉन्ट्रास्ट दिसतो. धार्मिक आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवते आणि याशी संबंधित कल्पना आणि दृष्टीकोन स्पष्ट करते.

कलर व्हीलमध्ये सापडलेल्या अनेक रंगांव्यतिरिक्त, काही रंग देखील आहेत. हे रंग आहेत:- काळा. पांढरा आणि राखाडी किंवा राखाडी.

(1) काळा रंग: – हा रंग प्रत्येक रंग शोषून घेतो, आणि कोणताही रंग परावर्तित करत नाही. म्हणूनच हा रंग आपल्याला काळा वाटतो. हा रंग अत्याधुनिक आणि मोहक आहे.

असे मानले जाते. परंतु हा रंग त्रास, धोका, नैराश्य, भीती आणि भावनांचा अभाव देखील दर्शवितो.

(२) पांढरा रंग: – हा रंग प्रत्येक रंग प्रतिबिंबित करतो, म्हणूनच सर्व रंग एकत्र होतात आणि पांढरा दिसतो. हा रंग स्वच्छ, स्वच्छ, निर्मळ, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे.

(३) राखाडी/राखाडी रंग:- हा रंग उर्जा आणि आत्मविश्वासाचा अभाव, भीती आणि नैराश्य दर्शवतो.

Thursday, 18 August 2022

भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

*भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*

१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला 
२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व 
३) महिना: श्रावण 
४) दिवस: अष्टमी 
५) नक्षत्र: रोहिणी 
६) दिवस: बुधवार 
७) वेळ: १२:०० रात्री
८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य. 
९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
१०) जेव्हा कृष्ण  ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध)  झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)
१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.

*कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.*
मथुरेत कृष्ण, कन्हय्या 
ओडिशामध्ये जगन्नाथ
महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा 
राजस्थानमध्ये श्रीनाथ
गुजरातमध्ये द्वारकाधीश
गुजरातमध्ये रणचोछोड
कर्नाटकातील उडुपी, कृष्णा
केरळमधील गुरुवायुरप्पन 

जन्म ठिकाण:- मथुरा
जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)
गुरु, शिक्षक:-  ऋषी संदिपनी
जिवलग मित्र:- सुदामा

*धर्मपत्नी ८:-* रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)

*कृष्णाची मुले:-* एकूण ८०

*श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.*

*श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.*

*श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.*

*श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.*

*श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.*

*श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.*

*श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.*

*श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.*

*राधा:-* राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. 

*श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु*

*आवडती फुल:-* फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)

प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.

*शंख:-* शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.

*आयुधं:-* त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.

*बासरी:-* कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .

*मोरपंख:-* रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.

*शिक्षण:-* श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

*कार्य:-* कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.

*गीता उपदेश:-* महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.

*श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण*

कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."
"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.
  
*अवतार समाप्ती:-* महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला
  
यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे  युगे।।।।

श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय ...

*🚩🔥जय श्रीकृष्ण 🌹🌹

Thursday, 11 August 2022

अशी होते तिरंगी झेंड्याची निर्मिती !

*🇮🇳 अशी होते तिरंगी झेंड्याची निर्मिती !*

*सौजन्य : सकाळ*
*दि. ९ ऑगस्ट २०२२*

तिरंगी ध्वज बनतात मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड विभागात, देशभरात अभिमानाने फडकतो तिरंगी झेंडा.

नांदेड : केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला तीन रंगांचा मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज हा भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. पण या तिरंगी ध्वजातील तिन रंग कसे आणि कुठुन एकत्र येतात. त्याचे प्रमाणिकरण कसे केले जाते. कपड्याच्या साईजनुसार कोणती दोरी वापरली जाते, नेफा पट्टी कोणत्या कापडापासून तयार केली जाते. या सारख्या अतिशय दुर्मिळ माहितीचा खजाना ‘सकाळ’ने या लेखात आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

*अशी झाली मराठवाडा खादी समितीची स्थापना*

आजच्या ६५ वर्षापूर्वी हैदराबाद येथे खादी समितीचे मुख्य तर लातूर जिल्ह्यातील ‘औसा’ येथे उपकेंद्र होते. ही संस्था महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा आंध्रप्रदेश पर्यंत विखुरली होती. कालांतराने मराठी भाषावाद निर्माण झाला आणि १ मे १९६० ला स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर मराठी माणसाच्या मनात मराठवाडा खादी समिती वेगळी व्हावी, असा विचार रूजत गेला आणि १९६७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ व स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुढाकारातुन मराठवाडा खादी समितीची स्थापना आली. शरद पवार यांच्यामुळे खादीला ‘अच्छे दिन’ मराठवाडा खादी समितीच्या स्थापनेनंतर सुरवातीस मराठवाड्यात खादीची १५ केंद्र होती. यात खादी कपड्यांची निर्मिती होत असे. अंबेजोगाई, बीड, औसा, उदगीर ही खादी उत्पादनाची मुख्य केंद्र म्हणून ओळखली जात. यात ‘दोसुती’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जाड्या भरड्या कापडाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात होती. १९७८ मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दल’ (पुलोद) सरकार सत्तेवर आले आणि शरद पवार पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुलोद सरकार सत्तेवर येताच शरद पवार यांनी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना खादीचे ‘दोसुती’ कापड वापरणे बंधनकारक केले. यासाठी शासनाकडून दरवर्षी खादीला एक कोटी रुपयांची कपड्यांची मागणी असायची. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने खादीला ‘अच्छे दिन’ आले.

आणि पुन्हा खादीला उतरती कळा लागली तीन वर्षानंतर, अचानक ‘पुलोद’ सरकार कोसळले त्यामुळे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मंत्रालय भारत सरकारकडून मिळणाऱ्या खादी कपड्यांची मागणी बंद झाली आणि खादीला पुन्हा उतरती कळा लागली. दरम्यान, कर्नाटक व इतर एका ठिकाणाहून तिरंगी ध्वज तयार करुन ते देशात पाठवले जात होते. परंतु, देशातील एकंदरित तिरंगी झेड्यांची मागणी लक्ष घेता या केंद्राकडून तिरंगी झेंड्याची मागणी पूर्ण होत नव्हती; म्हणून मराठवाडा खादी समितीकडे असलेल्या खादी कपड्यापासून तिरंगी झेंडा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कपड्याचे उत्पन्न करण्याची मागणी मिळाली. तिरंगी ध्वजाची १९८२ सालापासून मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड विभागातील उदगीर केंद्रात कपड्याची निर्मिती सुरू झाली. उत्पादित केलेले हे कापड मुंबई येथील खादी ग्रामोद्योग संघाच्या डॉकीयॉर्ड येथे पुरविले जात. खादीचे कापड योग्य की अयोग्य यासाठी मुंबईहून सुरेश जोशी आणि श्री.पटेल ही दोन व्यक्ती कापडाची गुणवत्ता तपासून तिरंगी झेंड्यासाठी लागणारे खादीचे कापड घेऊन जात. दहा वर्षापर्यंत हा उपक्रम सुरू होता. 

*मराठवाडा खादी ग्रामोद्योगची कोटीची उड्डाणे*

मराठवाडा खादी समितीच्या नांदेड मध्ये तिरंगी झेंडा का? तयार करू नये असे वाटले. आणि प्रत्यक्ष विचार कृतीत उतरला आणि चक्क सुरेश जोशी नावाच्या गृहस्थाला नांदेडला बोलावून तिरंगी झेंड्याची निर्मिती सुरू झाली. आज मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड विभागात तयार झालेला तिरंगी ध्वज देशभरात अभिमानाने फडकतो. वर्षाला विविध आकारामध्ये १५ ते २० हजार तिरंगी ध्वज तयार केले जातात. यातुन मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस वर्षाला एक कोटी रूपयांचे उत्पन्न एकट्या तिरंगी झेंड्यातुन मिळते. बीआयएस अंतर्गत तपासणी ब्युरो ऑफ इंडीयन स्टॅडर्ड (बीआयएस) ही एक शासकीय नामांकन पद्धत आहे. याद्वारे कपड्याची क्वॉलिटी तपासली जाते. त्यानंतर तिरंगी झेंड्यासाठी कापडाची निवड केली जाते. प्रक्रियेसाठी एक महिण्याचा अवधी. उदगीर येथे तयार झालेली ‘बटींग’ खादीचे तीन प्रकार असतात. हिरवा, केशरी ही दोन रंगाची कापड ब्लिचिंगसाठी अहमदाबाद येथे पाठविली जातात. यासाठी कपडा पाठवण्यासाठी व पुन्हा कपडा परत येण्यासाठी किमान १६ दिवस जातात. तर कपड्याला ब्लिच करण्यासाठी १५ दिवस लागतात. त्यामुळे तिरंगी झेंड्याच्या कापडावर प्रक्रिया करण्यासाठी एक महिण्याचा अवधी लागतो. ब्लिचिंग नंतर कपड्याची केली जाते कटींग  -१४ बाय २१ फुट, ८ बाय २१ फुट, ६ बाय ९ फुट, ४ बाय ९ फुट, ३ बाय साडेचार फुट, २ बाय ३ फुट या शिवाय कार फ्लग हे साडेसाह इंच बाय नऊ इंच, अशा विविध आकारामध्ये तिरंगी ध्वज तयार केले जातात. 

तिरंगी ध्वजाच्या दोन्ही आकारावर अशोकचक्र छापले जाते. त्यानंतर केशरी, पांढरा आणि हिरवा रंग एकत्रित करुन ध्वज शिलाई केली जाते. त्यानंतर ध्वज फडकताना फाटु नये म्हणून ध्वजाच्या चारी बाजुने ॲंगल लावला जातो. आणि सर्वात शेवटी डक खादी कपड्याची नेफा पट्टी लावली जाते. या साईजच्या फ्लॅगसाठी दोरीचे मापदंड विविध प्रकारच्या आकारामध्ये तयार करण्यात आलेल्या ध्वजासाठी विविध साईज मध्ये ‘दोरी’ आणि ‘गरेडी’ वापरावी लागते. यासाठी १४ बाय २१ फुटाच्या ध्वजासाठी ३८ एमएम, ८ बाय १२ फुटा साठी ३२ एमएम, ६ बाय ९ साठी २५ एमएम, २ बाय ३ साठी १९ एमएम दोरीचा वापर केला जातो तर कार फ्लॅगसाठी ‘ब्रास’ नावाचा वायर पापरला जातो.  

वर्षाला १५ ते २० हजार ध्वज निर्मिती पंचवीस वर्षापूर्वी मी नांदेडच्या खादी भांडारात येऊन तिरंगी झेंड्यासाठी लागणाऱ्या कापडाचे प्रामाणिकिकरण करुन योग्य कापडाची निवड करत होतो. त्यानंतर मला मराठवाडा खादी समितीने नांदेडला बोलावले आणि तिरंगी ध्वज निर्मितीचे नगावर काम दिले. तेव्हा पासून मी केवळ तिरंगी ध्वजाच्या प्रेमापोटी परिवार सोडून नांदेडात आलो. सुरुवातीस वर्षाला एक हजार पर्यंत तिरंगी ध्वज निर्मिती केली जात होती. आज वर्षाला १५ ते २० हजार ध्वज निर्मिती केली जाते.

*सुरेश जोशी, राष्ट्रध्वज उत्पादक प्रमुख*

Wednesday, 10 August 2022

धर्मादाय रुग्णालय

💥 *पुण्यात रहाणारे आणि बाहेरुन येणारे उपचारासाठी जाण्याआधी हे अवश्य वाचा..!*💥

*काॅपी करून योग्य ठिकाणी ठेवा..!*

*पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा  या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.*
*याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी  वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, मुख्यमंत्र्यांना व धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या  प्रयत्नाला यश आले आहे, याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे, उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.*

*राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू*
*धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे, राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल, वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.*

धर्मादाय रुग्णालयाचे नाव/वैद्यकीय केंद्राचे नाव, पत्ता व वैद्यकीय समाजसेवकाचे नाव 
१ रुबी हॉल क्लिनिक,४०, ससून रोड, पुणे-४११००१. ७४९ ७५ ७५ श्रीमती.पुनम चव्हाण    ०२०-२६१२३३९१/ ९७३००१२९६५ श्रीमती.पुनम चव्हाण    ०२०-२६१२३३९१/ ९७३००१२९६५ .

२ जहांगीर हॉस्पिटल,३२, ससून रोड, पुणे -४११००१. ३३५ ३३ ३३ श्री.गोपाल फडके           ०२०-६१८१९९९९ ८८८८२१०१० श्री.गोपाल फडके           ०२०-६१८१९९९९ ८८८८२१०१० श्री.प्रवीण बाळकृष्ण चव्हाण 7447643642 
३ एन एम वाडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल जवळ, ३२, ससून रोड, पुणे- ४११००१. ५७ ६ ६ श्रीमती.इच्चापुरीया            ०२०-२६०५८१३६ श्रीमती.इच्चापुरीया          ०२०-२६०५८१३६ ..... 

४ एन  एम वाडिया हॉस्पिटल, २८३, शुक्रवार पेठ, पुणे-४११००२. ७० ७ ७ श्रीमती.स्मिता करंदीकर     ०२०-२४४७०७९३ ९८५०९३१९१६ श्रीमती.स्मिता करंदीकर     ०२०-२४४७०७९३ ९८५०९३१९१६ 

५  ईनलॅक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, ७-९ , कोरेगाव पार्क, पुणे-४११००१. ३६९ ३७ ३७ श्री.पुरुषोत्तम सारडा      ०२०-६६०९९९९९ ९८२२०५३०२८ श्री.पुरुषोत्तम सारडा      ०२०-६६०९९९९९ ९८२२०५३०२८ श्रीमती.पुनम सचिन हरिहर        7040202471 
६ के ई एम हॉस्पिटल,४९९ ,रास्तापेठ, पुणे-४११०११. ५५० ५५ ५५ श्री.विजय यादव          ०२०-६६०३७३१७ ९८२२१२१०३१ श्री.विजय यादव          ०२०-६६०३७३१७ ९८२२१२१०३१ 

७ संचेती हॉस्पिटल, १६, शिवाजीनगर , पुणे-४११००४ १०० १० १० श्री. आर.वाय.पवार      ०२०-२५५३६२६२  ९८८१२३५७६७ श्री. आर.वाय.पवार      ०२०-२५५३६२६२/  ९८८१२३५७६७ 

८ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ३० सी, एरंडवणे,कर्वे रोड, पुणे-४११००१. २०२ २० २० श्रीमती.शर्मिला पाध्ये     ०२०-२५४०३२७  ९६७३३३८०७४  श्रीमती.शर्मिला पाध्ये     ०२०-२५४०३२७/  ९६७३३३८०७४  

९ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,एरंडवणे, पुणे-४११००४. ६२६ ६२ ६२ श्रीमती.शिरोडकर        ०२०-४९१५२०२०   ०२०-६६०२३०२०  श्रीमती.शिरोडकर        ०२०-४९१५२०२०/   ०२०-६६०२३०२०  श्री.चंद्रकांत शिवाजी केदार     9967259545 

१० माई मंगेशकर हॉस्पिटल,स. नं ११७/१ मुंबई बेंगलोर हायवे, वारजे, पुणे-४११०५८. ४५ ४ ४ श्रीमती.मुग्धा              ०२०-४०५४१००० ८६९८१७७६६५ श्रीमती.मुग्धा              ०२०-४०५४१०००/ ८६९८१७७६६५ 

११ भारती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री  मार्ग,पुणे-४११०३०. ८३१ ८३ ८३ श्री.प्रवीण जाधव        ८५५१०९९८९८        ०२०-४०५५५५५५ श्री.प्रवीण जाधव        ८५५१०९९८९८        ०२०-४०५५५५५५ श्री.अविनाश रामदास चव्हाण      9881375319

१२ भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल,कात्रज,धनकवडी ,पुणे-४११०४३. २०० २० २० श्री.शेख/सुरज मोहिते            ०२०-४०५५५६३१ ९८९०४७८६६६ श्री.शेख                       ०२०-४०५५५६३१ ९८९०४७८६६६ 

१३ आयुर्वेद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम,केसनंद रोड,वाघोली, पुणे-४१२२०७.                                                                                                                                                                                             १६५ १७ १७ श्री. बागायतकर          ०२०-६७३४६१२१ ९४०३३३५४६८० श्री. बागायतकर          ०२०-६७३४६१२१ ९४०३३३५४६८० 

१४ पूना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,२७,सदाशिव पेठ ,पुणे-४११०३०. २४५ २४ २५ श्री.सी.पी.ठक्कार            ०२०-६६०९६०००         ९८२२७०७१८८ श्री.सी.पी.ठक्कार            ०२०-६६०९६०००         ९८२२७०७१८८ 

१५ रत्ना मेमोरियल हॉस्पिटल,९६८,सेनापती बापट रोड,पुणे-४११०५३. १० श्रीमती.विजयमाला चव्हाण ०२०-४१०९७७७७ ७०३८१०२६७५  श्रीमती.विजयमाला चव्हाण ०२०-४१०९७७७७ ७०३८१०२६७५  श्रीमती.प्रज्ञा अविनाश चव्हाण                   9766316918 

१६ जोशी हॉस्पिटल, ७७८, कमला नेहरू पार्क समोर,शिवाजी नगर,पुणे-४११००४.  ९० ९ ९ श्री.सुधाकर गवंडगावे   ०२०-४१०९६६६६ ९४०३५४३२८५ श्री.सुधाकर गवंडगावे   ०२०-४१०९६६६६ ९४०३५४३२८५ श्री.अमित गंगाधर शेंडगे 9975875853 

१७ लोकमान्य हॉस्पिटल, टेल्को रोड, चिंचवड,पुणे-४११०३३. १०१ १० १० श्रीमती.स्नेहल बिकुले     ०२०-४६६०६८०० ९६७३९९४७०९ श्रीमती.स्नेहल बिकुले     ०२०-४६६०६८०० ९६७३९९४७०९ 

१८ लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे-४११०४४. १०९ १० १० श्रीमती.राजश्री काशिकर ०२०-४६६०६८०० ९५५२५३२०३६ श्रीमती.राजश्री काशिकर ०२०-४६६०६८०० ९५५२५३२०३६ 

१९ वैद्य. पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल, २५, कर्वे रोड, पुणे-४११००४. १० २ २ श्रीमती.मोहिनी वसवे    ०२०-२५४४०९२२  श्रीमती.मोहिनी वसवे    ०२०-२५४४०९२२  

२०  सूतिका सेवा मंदिर रुग्णालय,२५२,नारायण पेठ,लक्ष्मिरोड,पुणे-४११०३०. १६ २ २ श्री.सुरेश  देवधर          ०२०-२४४५४७२४ श्री.सुरेश  देवधर          ०२०-२४४५४७२४ 

२१ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, (एन आई ओ हॉस्पिटल),महात्मा फुले म्युझियम जवळ,शिवाजीनगर, पुणे-४११००५. १६ २ २ श्रीमती.सुनीता कांबळे  ०२०-४१४६०१०० ८६००००५५२४ श्रीमती.सुनीता कांबळे  ०२०-४१४६०१०० ८६००००५५२४ 

२२ सेठ. ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल,५८०/२, रास्तापेठ वै.नानल शास्त्री पथ,पुणे -४११०११. 

 २१ श्री.संजय कुऱ्हाडे          ०२०-२६३३६२९६ ९७६७४४००४८ श्री.संजय कुऱ्हाडे          ०२०-२६३३६२९६ ९७६७४४००४८ 

२३ सुबुध हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, १४५/३,४, शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे- ४११०३८.  ३० ३ ३ श्री.ज्योत्सना ह्तरमनी    ०२०-२५३९४४६४ ९६६५९१७१९२ श्री.गिरीश धोटे          ०२०-२५३९४४६४ ७०३८२४६८५६ 

२४ संजीवन हॉस्पिटल,  प्लॉट न.२३, कर्वे रोड, पुणे-४११००४. ८० ८ ८ श्रीमती.संगीता भालशंकर   ०२०-२५४२४३८४ ९८२२५४४४३१ श्रीमती.संगीता भालशंकर  ०२०-२५४२४३८४ ९८२२५४४४३१ 

२५ कवडे नर्सिग होम,मनिषा थेटर जवळ उत्तमनगर, पुणे-४११०२३. ३० ३ ३ श्री.अजय कवडे ९८२२५२३०२३ श्री.अजय कवडे ९८२२५२३०२३
 
२६ साने गुरुजी आरोग्य केंद्र, माळवाडी, हडपसर, पुणे-४११०२८. २२५ २३ २३ श्रीमती.स्वाती जोशी-पवार  ०२०-२६९९९४०५   ९९७५७८८७१२ सागर मिटकरी          ०२०-२६९९९४०५ ९८२३९७८९१८ 

२७ विलू पूनावाला हॉस्पिटल, स.नं.८४, पुणे सोलापूर  रोड, वैभव थेटर मागे, हडपसर, पुणे-२८. ५९ ६ ६ श्रीमती.निरंजनी कुमार        ०२०-६७४५२२२२ ८९९९५२०६७७ श्री.एन.वाय.शेख         ०२०-६७४५२२२२ ९०२१३७६९८५ 

२८ इनामदार मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटल,स.नं. १५, फातिमानगर,पुणे-४११०४०. १०२ १० १० श्रीमती.रुचा बोरवणकर ०२०-३०५०२२४४   ०२०-६६८१२२२२ ९०११०००२०१ श्रीमती.रुचा बोरवणकर ०२०-३०५०२२४४   ०२०-६६८१२२२२ ९०११०००२०१ 

२९ डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,पिंपरी, पुणे-४११०१८. १४७० १४७ १४७ श्रीमती.अनिता पवार ७३५०१७५१७७ श्रीमती.रुपाली ठाकरे ९९६०९६६८१५ डॉ.शालिनी ९९६००८१३६९       ०२०-२७४२२१३४ श्रीमती.संगीता वेणुगोपाल 7038499801
9011973941
 
३० धन्वंतरी हॉस्पिटल,सेक्टर नं २७, टिळक रोड, प्राधिकरण, निगडी, पुणे-४११०४४. ३० ३ ३ श्रीमती.स्मिता घोबाले    ०२०-२७६५६९५० ९९२२३४४४१५ श्रीमती.स्मिता घोबाले    ०२०-२७६५६९५० ९९२२३४४४१५ 

३१ डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,पुणे-४१०५०७. ५७० ५७ ५७ श्री.संदीप टिळेकर            ०२११४-३०८३०० ८०८७०९९०४०/४१/४२ श्री.संदीप टिळेकर            ०२११४-३०८३०० ८०८७०९९०४०/४१/४२ 

३२ तळेगाव जनरल हॉस्पिटल,तळेगाव  दाभाडे,जि-पुणे-४१०५०७. ६ १ १ श्रीमती.निर्मला वटकर   ०२११४-२२२२३८ ८४८३०४२३०९ श्रीमती.निर्मला वटकर   ०२११४-२२२२३८ ८४८३०४२३०९

३३ सेवाधाम हॉस्पिटल, वडेश्वर तळेगाव दाभाडे, पुणे-४१०५०७. ४० ४ ४ श्रीमती.दीपा गुरव    ०२११४-२२२४५६ ०२११४-२२२४६२  श्रीमती.दीपा गुरव    ०२११४-२२२४५६ ०२११४-२२२४६२  

३४ परमार हॉस्पिटल, स.नं.२५५,भंगारवाडी, लोणावळा -४१०४०१. २० २ २ श्री.धनंजय             ०२११४-२७३००७ ८३९०८०३२५४ श्री.धनंजय             ०२११४-२७३००७ ८३९०८०३२५४ 

३५ गिरीराज हॉस्पिटल,बारामती, पुणे. ७५ ८ ८ श्री.रोकडे               ०२११२-२२२७३९ ९८८१९५३५७२ डॉ.रमेश भोईटे      ०२११२-२२२७३९ ९८२२२१७१४७ 

३६ कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल, केडगाव, पुणे- ४१२२०३. ३० ३ ३ श्री.सरोज कदम       ०२११९-२२३१२२ श्रीमती.सरला शर्मा   ९९७५१५१६४९ 

३७ मोहन ठुसे आय हॉस्पिटल,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे. ६० ६ ६ श्री.पुराणिक            ०२१३२-२४४३९८ ९९७५५६३४५९ श्री.पुराणिक            ०२१३२-२४४३९८ ९९७५५६३४५९ 

३८ डॉ.जलमेहता रुरल क्रिटीकल केअर सेंटर ,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे ६ १ १ डॉ.राऊत    ९७६६५८७६७६ डॉ.राऊत    ९७६६५८७६७६ 

३९ मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, घोडनदी (शिरूर ) जि.पुणे-४१२२१०. ३६ ४ ४ श्री.अमरीश सूर्यवंशी   ०२१३८-२२४५९९ ९८२२८७४८६० श्री.अमरीश सूर्यवंशी   ०२१३८-२२४५९९ ९८२२८७४८६० 

४० श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल  अॅण्ड रिसर्च सेंटर,सर्वे नं.४९/१ नऱ्हे, मुंबई-पुणे बायपास,पुणे-४११०४१. ९४० ९५ ९५ श्री.उत्तम सोनवणे         ०२०-२४१०६२७१ ९७६७७९२८७९ श्री.हर्षल पांडवे         ०२०-२४१०६२७१ ९८६०४०४८३५ 

४१ सिंहगड डेंटल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर, सर्वे नं.४४/१ ,वडगाव (बुद्रुक), ऑफ सिंहगड रोड,पुणे-४११०४१. .... .... .... श्री.शिंदे                     ०२०-२४३५१३०७ श्री.शिंदे                     ०२०-२४३५१३०७ 

४२ हरजीवन हॉस्पिटल,९८३/३, शुक्रवार पेठ ,पुणे-४११००२. १९ २ २ श्रीमती.शिल्पा सेठ       ०२०-२४४४०९८१ ७७७४००७९८१ श्रीमती.शिल्पा सेठ       ०२०-२४४४०९८१ ७७७४००७९८१ 

४३ हार्डीकर हॉस्पिटल, ११६०/६१ ,युनिवर्सिटी (विद्यापीठ )रोड,शिवाजीनगर, पुणे-४११००५.  ८० ८ ८ श्री.संभाजी पाटील         ०२०-४१९५००० ७७७४०६४०९० श्री.संभाजी पाटील         ०२०-४१९५००० ७७७४०६४०९० 

४४ साळी हॉस्पिटल,मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे. १८ २ २ डॉ.साळी                ०२१३३-२२३२०८ ७५८८६८०३४१ डॉ.साळी                ०२१३३-२२३२०८ ७५८८६८०३४१ 

४५ दिनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, ९२६, एफ.सी रोड, शिवाजीनगर,पुणे-४११००४. ७० ७ ७ श्री.गोडबोले               ०२०-६६४९८८८८ ९९६७४९०२४८ श्री.गोडबोले               ०२०-६६४९८८८८ ९९६७४९०२४८ 

४६ महात्मा गांधी नेत्र रुग्णालय,४६८/४ सदाशिव पेठ,पुणे- ४११०३० १६ २ २ श्रीमती.रइसा मोमीन      ०२०-२४४७९४४३ ९१५६४७९३१३ श्रीमती.रइसा मोमीन      ०२०-२४४७९४४३ ९१५६४७९३१३ 

४७ मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पावर हाउस चौक,चिंचवडगाव, पुणे-४११०३३. ४० ४ ४ श्रीमती.पिल्ले  ०२०-२४६१४०००/५००० ९९२२६१३७४०  श्री.व्ही.आर.वैशंपायन    ०२०-२४६१४००० ९९७५६०६४९७ 

४८ मीरा हॉस्पिटल,७१०/बी-४, भवानी पेठ, शंकर सेठ रोड, पुणे-४११०४२. ५० ५ ५ श्री.आर.ए.मेहता    ९६७३२१४४१६ श्री.आर.ए.मेहता ९६७३२१४४१६ 

४९ मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र,मोहनवाडी, येरवडा, पुणे-४११००६. १०० १० १० श्री.गणेश बागडे            ०२०-२६६९७६०५ ९८५०४५८५४९ श्री. भगत                   ०२०-२६६९७६०५  

५० एस हॉस्पिटल(ACE),स.नं.३२/२ अ,एरंडवणा, हॉटेल अभिषेक समोर,गुळवाणी महाराज रोड,पुणे-४११००४. ४० ४ ४ श्री.तृप्ती शिंदे                 ०२०-२५४२३२५३  ९१५८१८५४९४  डॉ.आनंद बर्वे            ०२०-२५४२३२५३  ९४२३००५०२३ 

५१ एम्स हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर(AIMS), सर्वे नं.१५४, एम्स चौक,औंध पुणे -४११००७. १०० १० १० श्री.सुलक्षणा कातोरे        ०२०-२५८०१००० ८८८८८७१६९५ श्री.सुलक्षणा कातोरे        ०२०-२५८०१००० ८८८८८७१६९५ 

५२ एच व्ही देसाई आय हॉस्पिटल,स.नं.९३/२ तारावाडे वस्ती मोहम्मदवाडी,हडपसर,पुणे-४११०६०. ९५ १० १० श्री.मानस काळे            ०२०-२६९७००४३ ९६८९९४६६१७ श्री.मानस काळे            ०२०-२६९७००४३ ९६८९९४६६१७ 

५३ इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी-चाकण  रोड,आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे. ३० ३ ३ श्रीमती.अंजली गव्हाणे  ०२१३५-२३२०७३ ९९२१३६०३७९ श्रीमती.अंजली गव्हाणे  ०२१३५-२३२०७३ ९९२१३६०३७९ 

५४ संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, संत नगर, सेक्टर नं .४ मोशी प्राधिकरण,पुणे-४१२१०५. १०० १० १० श्रीमती.निता वाणी       ०२०-६७९००९००/९०१  ९८६०६५१०३४ श्रीमती.निता वाणी       ०२०-६७९००९००/१ ९८६०६५१०३४ 

५५ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल,सर्वे नं.३१, थेरगाव, चिंचवड, पुणे-४११०३३. ३१९ ३२ ३२ श्री.सागर काकड           ०२०-३०७१७५०० ९०११०१६१२४ श्री.सागर काकड           ०२०-३०७१७५०० ९०११०१६१२४

५६ आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सेक्टर नं.२७,प्राधिकरण, निगडी,पुणे-४११०४४  २१५ २२ २२ श्री.विनायक शिंदे         ०२०-२७६५९४६० ९८५०९३३५१२ श्री.विनायक शिंदे         ०२०-२७६५९४६० ९८५०९३३५१२ श्रीमती.सोनाली चंद्रकांत निकुंभ         9604990620
8446770873
 
५७ विश्वराज हॉस्पिटल, पुणे-सोलापूर रोड,लोणी रेल्वे स्टेशन जवळ,लोणी काळभोर, पुणे-४१२२०१  ११० ११ ११ श्रीमती.उमेश्वरी देवरे     ०२०-६९४०६०६० ८७९६९३५२२७ श्रीमती.उमेश्वरी देवरे     ०२०-६९४०६०६० ८७९६९३५२२७ ....

ही सर्वसामन्या लोकांसाठी रूगणालय आहे शासकीय अनुदानावर चालतात
FWD BY LGKURIL

आम्ही आहोत खान्देशी

🚩🚩 *आम्ही आहोत खान्देशी...* 🚩🚩 जिथे जन्मली *"झाशीची राणी"* ती आहे *"पारोळा नगरी"* असे हे पारोळा आहे खान्देश प्रांता ...